पाडळसे प्राथमिक आरोग्य केंद्रात खान्देश नारीशक्ती गृपतर्फे कोरोना योद्ध्यांचा सन्मान

फैजपूर, प्रतिनिधी । कोरोना महामारी संकटकाळात जीव धोक्यात घालून घरोघरी जाऊन कोरोनाविषयी जनजागृती करत आरोग्यसेवा देणाऱ्या आशा स्वयंसेविकांचा कोरोना योद्धा सन्मान पत्र देऊन खान्देश नारीशक्ती गृप, दिपाली गृप्स फैजपूर यांच्यावतीने गौरव करण्यात आले.

जगात सगळीकडे कोरोना महामारीमुळे रुग्ण संख्या वाढत आहे. अशा परिस्थित यावल तालुक्यातील आशा सेविका प्रत्येक गावात घरोघरी जाऊन जनजागृती करून कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. खरेतर आशा सेविका व आरोग्य कर्मचारी हे एकप्रकारे राष्ट्रसेवा करीत आहेत म्हणून त्यांचा सन्मान केल्याने अजुन जोमाने सेवाकार्य करण्याची प्रेरणा त्यांना मिळेल असे प्रतिपादन खान्देश नारीशक्ती गृप, दिपाली गृप्स अध्यक्षा दिपाली चौधरी झोपे यांनी केले.

अध्यक्षस्थानी खान्देश नारीशक्ती अध्यक्षा दिपाली चौधरी झोपे या होत्या. जन संघ सेवक मंच प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील, लॅब टेक्नीशीयन लोकेश पाटकरी, आरोग्यसेविका आर. ए. पटेल, अन्नपूर्णा चव्हाण, आशालता नेहेते, आर. बी. चौधरी, पुजा नेवे, मनिषा जाधव, ज्योती सपकाळे, आरोग्यसेवक सतिष पवार, जयंत पाटील, गिरीश जावळे, सुनील निकम, आशा गटप्रवर्तक निलिमा योगेश ढाके, अर्चना विनोद सोनवणे, दिपाली कोळंबे, अटेंडण्ट सिंधु महाजन, ज्योती केदारे, छाया पांडव, लता सोनवणे, जया सपकाळे, मीना गुरव, अंगणवाडी सेविका सुरेखा चौधरी, सुलभा नेमाडे, शिपाई भावना तायडे, तुषार केरोसिया, वाहनचालक पंकज तायडे यांच्यासह पाडळसा, भोरटेक, बामणोद, म्हैसवाडी, पिळोदा, अंजाळा, वाघळूद, दुसखेडा, कासवा, कठोरा, अकलूद, कोसगाव, वनोली, वढोदा, रिधुरी, करंजी, विरोदा परिसरातील सर्व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.

Protected Content