चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील तळेगाव येथिल विविध सहकारी सोसायटीवर स्व. विनय देशमुख प्रणित शेतकरी सहकार विकास पॅनलने झेंडा रोवत विजय संपादन केले आहे.
दरम्यान, विविध कार्यकारी सोसायटीच्या १३ पैकी ९ जागांसाठी रविवार (दि.२४) मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानंतर लगेचच मतमोजणी पार पडली. तदनंतर विजयी उमेदवारांची घोषणा करण्यात आली.
यात सोसायटीच्या १३ जागांपैकी ४ जागा पूर्वीच बिनविरोध झाल्याने उर्वरित ९ जागांसाठी मतदान घेण्यात आले. यात सर्व जागांवर विजय संपादन करीत ‘शेतकरी सहकार विकास’ पॅनलने आपला झेंडा रोवत वर्चस्व सिद्ध केले तर सभासदांनी शेतकरी सहकार पॅनलवर विश्वास दाखवत सलग ४० व्या वर्षी सत्ता सोपवली.
यात सोसायटीच्या १३ जागांपैकी ४ जागा पूर्वीच बिनविरोध झाल्याने उर्वरित ९ जागांसाठी मतदान घेण्यात आले. यात सर्व जागांवर विजय संपादन करीत शेतकरी सहकार पॅनलने आपला झेंडा रोवत वर्चस्व सिद्ध केले तर विविध विकास कार्यकारी सोसायटी ही शेतकऱ्यांच्या विकासाचा एक महत्चाचा दुवा असून शेतकऱ्यांच्या हितासाठी व आर्थिक दृष्ट्या अधिक सक्षम करण्याचे काम यापुढेही केले जाईल असा विश्वास पॅनल प्रमुख अतुल देशमुख यांनी यावेळी सांगितले.
एकूण ७०० सभासदांपैकी ५७१ मतदारांनी मतदान केले तर ५० मते बाद ठरलीत. यात अनुसूचित जाती जमाती गटातून युवराज मोरे (४६८) तर सर्वसाधारण गटातून अतुल देशमुख (४४६), भास्कर चव्हाण (४१९), कल्याणराव देशमुख (४३५), सयाजी देशमुख (४२८), शिवाजी काटकर (४४५), जिजाबाई पाटील (४२५), काळू राठोड (३८६), सुभाष ठोके (४२४) हे ९ सदस्य निवडून आले आहेत.
तर यापूर्वी निर्मलाबाई गोरे, चेतना शेलार, पराग कासार, सोपान नायकुडे हे सदस्य बिनविरोध म्हणून निवडून आले होतेत. विजयी उमेदवारांच्या नावाची घोषणा होताच समर्थकांनी घोषणाबाजी करत गुलाल उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून भाऊसाहेब महाले तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून सचिव प्रदीप मोरे यांनी काम पाहिले.