चाळीसगावात एका तासात तब्बल आठ हजारांचा दंड वसूल

 

चाळीसगाव, प्रतिनिधी । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता तो रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. अशा विना मास्क फिरणाऱ्यावर नगरपालिका व पोलिस प्रशासन यांनी संयुक्तपणे कारवाई करत एका तासात ८ हजारांचा दंड वसूल केला.

शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विना मास्क बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून नगरपालिका व पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने विना मास्क नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. दुपारी १२ वाजता दंडात्मक कारवाईही सुरूवात केली असता. एकाच तासात तब्बल आठ हजारांच्या दंडाची वसुली करण्यात आली. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले, सहायक पोलिस निरीक्षक कापडणीस, एस. आय. धर्मराज पाटील, विजय पाटील, विनोद खैरनार , दिपक पाटील, शैलेश पाटील, निलेश पाटील तसेच नगरपालिका कर्मचारी प्रकाश पाटील व निलेश चौधरी आदींनी केली.

Protected Content