अकोल्यात महिलांकडून लाडकी बहीण योजनेसाठी पैसे मागणारा तलाठी निलंबित

अकोला-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी गेलेल्या महिलांची फसवणूक होत असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी आलेल्या महिलांकडे पैसे मागितल्यास किंवा कोणत्याही प्रकारची गडबड झाल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिला. याच पार्श्वभूमीवर अकोल्यात योजनेच्या नोंदणीसाठी महिलांकडून तलाठीने लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी संबंधित तलाठीचे निलंबन करण्यात आले असून लवकरच त्याच्याविरोधात कारवाई केली जाईल.

राजेश शेळके असे निलंबन झालेल्या तलाठीचे नाव आहे. लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी आलेल्या महिलांकडून पैसे मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून शेळकेविरोधात कारवाई करण्यात आली. शेळके यांच्याविरोधात अकोल्यातील सिव्हील लाईन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच त्यांना अटक केली जाईल. मोठी उमरी येथील तलाठी कार्यालयात योजनेसाठी नोंदणी सुरू होती. त्यावेळी शेळके यांनी महिलांकडून लाच घेतली, याचा व्हिडिओ व्हायरल होताच त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली.

Protected Content