जहाँआरा पटेल यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खानदेश स्टार पुरस्कार कमिटी तर्फे “आदर्श शिक्षिका पुरस्कार वर्ष 2024” वितरण सोहळा जळगाव येथे पार पडले. या निमित्त पटेल जहाँआरा अब्दुल मुनाफ यांना त्यांच्या कर्तृत्वासाठी “आदर्श शिक्षिका पुरस्कार” सन्मानित करण्यात आले. पटेल जहाँआरा हे 25 वर्षांपासून शैक्षणिक श्रेत्रात कार्यरत आहेत. अनेक वर्षांपासून ते शैक्षणिक व सामाजिक श्रेत्रात योगदान देत आहेत. पटेल जहाँआरा हे एका उर्दू शाळेत इन्चार्ज मुख्याध्यापिका देखील आहेत. पटेल हे इंग्रजी विषयातील पदवीधर आहेत. इंग्रजी भाषेत त्यांना 25 वर्षाचे अनुभव लाभलेले आहे.

पटेल हे आपल्या शाळेत सतत पणे उपक्रम घेत असतात. व सदैव विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मोलाचे योगदान देतात. पटेल हे खासकरून मुलींच्या शिक्षणासाठी तत्पर असतात. मुलींनी शिकावे व सुसंस्कृत व्हावे. त्यांचे सांगळे आहे की मुलगी शिकली अशाप्रकारे शिकली तर समाज आपोआप पुढे जातो. या शिवाय शैक्षणिक श्रेत्रात फार मोठे योगदान आहे. पटेल जहाँआरा हे अँग्लो उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, येवला, जिल्हा नाशिक येथील माजी मुख्याध्यापक मरहुम हाजी अब्दुल मुनाफ अब्दुल मजीद यांचे कन्या आहेत. धुळे जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्रातील माजी वरिष्ठ सहाय्यक हाजी गुलाब नूर मुहम्मद पटेल यांचे सुन आहेत व धुळे येथील मराठी शिक्षक सलिम हाजी गुलाब पटेल यांचे पत्नी आहेत.

Protected Content