लम्पी आजारासंदर्भात तात्काळ उपाययोजना करा – आमदार चिमणराव पाटील

पारोळा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मतदारसंघातील पारोळा, एरंडोल व भडगांव तालुक्यातील गुरांना लम्पीया आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून असून हा आजार अधिक प्रमाणावर बळावण्याची शक्यता असल्याने लसीकरणासाठी आवश्यक ती औषध सामग्री पुरवठा याचेसह तात्काळ आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार चिमणराव पाटील यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांना दिल्या आहे.

मतदारसंघातील पारोळा, एरंडोल व भडगांव तालुक्यातील गुरांना लम्पीया आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या ऐन हंगामाच्या वेळेस हा आजार बळावल्यामुळे बैलांसह गाय, म्हैस इत्यादी पशुधनाचा जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. यास्तव आपल्या स्तरावरून तात्काळ उपाययोजना करून उपचारासाठी आवश्यक औषध सामग्री तसेच हा आजार अधिक प्रमाणावर बळावण्याची शक्यता असल्याने लसीकरणासाठी आवश्यक ती औषध सामग्री पुरवठा याचेसह तात्काळ आवश्यक त्या उपाययोजना करण्याचा लेखी सूचना आमदार चिमणराव पाटील यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांचेकडे केली आहे.

Protected Content