राष्ट्रवादी देणार २७ टक्के ओबीसी उमेदवारांना तिकिट

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष २७ टक्के ओबीसी उमेदवारांना तिकिट देणार असल्याची घोषणा आज करण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील ९२ नगरपालिका आणि ४ नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. या सर्व निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होत आहेत. या अनुषंगाने राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकूण उमेदवारांपैकी २७ टक्के उमेदवार हे ओबीसी समाजाचे देण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. तशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. त्यांनी या संदर्भात ट्विट केले आहे.

ओबीसी समाजाला न्याय मिळणे आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाचे असल्याने येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या एकूण उमेदवारांपैकी २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देण्याचा निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने घेतला आहे, असे जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे जाहीर केले आहे.

याबाबत जयंत पाटील म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने सनदशीर मार्गाने सर्व प्रयत्न केले आहेत व यापुढेही करत राहू, असे ते म्हणाले.

Protected Content