काँग्रेस भाजपच्या नेत्यांच्या जवळीकतेने चर्चेला उधाण

खामगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले जयंतीनिमित्त निघालेल्या मोटारसायकल रॅलीमध्ये भाजपनेते आ. आकाश फुंडकर व कॉंग्रेस नेते नाना पाटील हे दोघे एकाच मोटारसायकल सोबत बसल्याने चर्चेला उधाण आले असून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

 

मागील विधानसभेच्या निवडणूकीत ऐनवेळी काँग्रेसकडून ज्ञानेश्वर (नाना) पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे भाजपचे उमेदवार आकाश फुंडकर व भाराकाँचे उमेदवार नाना पाटील यांच्यात लढत झाली होती. नाना व राणा जोडी गाजली होती. भाजपनेही धडकी घेतली होती. निवडणूकी दरम्यान लाडू (प्रसाद!) वाटण्यावरून वाद झाला होता, कार्यकर्ते सरसावले होते. तर आगामी विधानसभा निवडणूक खामगाव मतदार संघातून लढविण्याची नानाची जय्यत तयारी सुरू असल्याचे समजते. तर भाजपकडून आकाशदादा फुंडकर यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. असे असतानाही तर महात्मा ज्योतीबा फुले जयंतीनिमित्त आज ११ एप्रिल रोजी निघालेल्या मोटारसायकल रॅलीमध्ये आ. आकाश फुंडकर व नाना पाटील हे दोघे एकाच मोटारसायकल सोबत बसले होते. विशेष म्हणजे त्यांनी आलटून पालटून | दुचाकी चालविली होती. याबद्दल सर्वत्र चर्चा होत असून छायाचित्र व व्हिडिओ व्हायरल होत आहे.
गळ्यात गळे घालून गप्पा.. यावेळी फोन कर आणि पाटील अगदी गळ्यात गळे घालून गप्पा मारताना पाहायला मिळाले या मतदारसंघातील कार्यकर्त्यांना वेगळाच प्रश्न पडला वाचून राहणार नाही या नेत्यांसाठी आपण मतदारसंघात विरोध दर्शवित प्रसंगी पोलीस केसेस अंगावर घेतो तेच आपले नेते विरोधकांची गप्पा मारत बसले आणि शहरात एकाच गाडीवर भरले ही बाब दोन्ही पक्षातील अनेक नेत्यांचा कार्यकर्त्यांना आवडण्यासारखे होती मात्र या बुलेट वरील शहर बाहेरची चर्चा सर्व दूर होत आहे हे मात्र नक्की.. राजकीय विरोध, मतमतांतरे ,एक वेळ चालून जाईल पण अशीच सुसाट रपेट मतदार संघाच्या विकासाकरता सुद्धा या दोन्ही नेत्यांनी एकत्रितपणे करावी जेणेकरून मतदारसंघाचा विकास होईल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही…

Protected Content