रेशन दुकानदारांचा मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा (व्हिडिओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर फेडरेशन व अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा यावेळी इशारा देण्यात आला.

 

आंदोलकांनी पुढील मागण्या केल्या आहेत. यात प्रामुख्याने कोरोना महामारीमुळे मृत्युमुखी पडलेल्या परवानाधारकांचे कुटुंबाला ठराविक स्वरूपात मदत राष्ट्रीय पातळीवर घोषित करून त्यांना कोरोना योद्धा म्हणून घोषित करण्यात यावे. राष्ट्रीय खाद्य सुरक्षा योजना द्वारा सर्व परवानाधारकांना विश्व खाद्य कार्यक्रमांतर्गत ४४० रुपये कमिशन प्रतिक्विंटल मागे घोषित करावे. फक्त गहू तांदूळ अंतर्गत कार्डधारकांना साखर या खाद्यपदार्थावर एक किलो प्रती क्विंटल हँडलिंग लॉस सूट देण्यावर सर्व राज्यांनी तात्काळ निर्णय घेण्याबाबत कारवाई करण्यात यावी. सर्व राज्यातील स्वस्त धान्य दुकानांवर गहू, तांदूळ व्यतिरिक्त खाद्यतेल व दाळी दरमहा देण्यात याव्यात आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या आंदोलनात जिल्हा सचिव सुनील अंभोरे, ज्योती भाटीया, कृष्णा गोगावले, गणेश गायकवाड, दत्तात्रय पाटील, प्रदीप भावसार, निलेश भावसार, भारती पाटील, रवींद्र बऱ्हाटे, प्रकाश भंगाळे, शांताराम जोशी, बी. आर. सोनवणे आदी सहभागी झाले आहेत.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/413044310852863

 

Protected Content