नागरीकांनी दक्षता घेण्याचे यावल नगरपरिषदेचे आवाहन
यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल नगरपरिषदेच्या हद्दीत स्वाईन फ्यु ने कहर केल्याने सुमारे ८०० डूकरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती नगरपरिषदचे स्वच्छता अधिकारी सत्यम पाटील यांनी बोलतांना दिली. याबाबत नागरीकांनी दक्षता घेण्याचे आवाहन यावल नगर परिषदेकडून घेण्यात येत आहे.
यावल शहरातील नगर परिषदच्या कार्यक्षेत्रात मागील काही दिवसांपासुन विविध ठिकाणी अफ्रीकन स्वाईन फ्यु या विषाणुजन्य अशा आजाराने मोठ्याप्रमाणावर डुकरांचा मृत्यू होत आहे. मरण पावलेल्या डुकरांची दुर्गंधी ही अत्यंत वेगाने परिसरात पसरत असुन नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान या संदर्भात यावल नगर परिषदचे आरोग्य अधिकारी सत्यम पाटील यांच्याकडून जाणुन घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सांगितले की सदरची डुकर या जनावरांवर अफ्रीकन स्वाईन फ्यु या विषाणुजन्य आजाराची लागण झाली आहे. याची दक्षता घेत पशुसंवर्धन अधिकारी यांना याची जाणीव एक महीना आदीच करून दिली असल्याचे पाटील यांनी सांगीतले. दरम्यान या आजारामुळे आतापर्यंत सुमारे ८०० च्या जनावरांचा मृत्यु झाला असल्याने उपाययोजना म्हणुन नगर परिषदच्या माध्यमातून शेकडो जनावरे स्थळलांतरीत करून ईतर ठीकाणी पाठविण्यात आल्याचे आरोग्य व स्वच्छता अधिकारी सत्यम पाटील यांनी सांगीतले.