जिल्ह्यात आज ३४२ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह; जळगावसह पाचोऱ्यात संसर्ग वाढला

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या अहवालानुसार आज जिल्ह्यातील ३४२ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. आज आढळून आलेल्या अहवालात जळगाव शहरासह पाचोऱ्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. तर आजच २८० रूग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कायमच असल्याचे दिसून आले आहे. मात्र त्यासोबत आता बरे होणाऱ्या रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात ३४२ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले आहे. तर दुसरीकडे आजच २८० रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आज १२ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी जारी केलेल्या प्रेस नोटनुसार जिल्ह्यात ३४२ कोरोनाबाधीत आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ६१ रूग्ण हे जळगाव शहरातल आहेत. याच्या खालोखाल पाचोरा-४४, चाळीसगाव-२८ रूग्ण आढळून आले आहेत.

उर्वरित जिल्ह्याचा विचार केला असता, जळगाव ग्रामीण १८, भुसावळ-२०, अमळनेर-२३, चोपडा-२२, भडगाव-९, धरणगाव-१६, यावल-१६, एरंडोल-२२, जामनेर-१९, रावेर-१०, पारोळा-३, मुक्ताईनगर-१५, बोदवड-१५ अन्य जिल्हातील ३ असे एकुण ३४२ रूग्ण आज आढळून आले आहे.

तालुकानिहाय एकुण रूग्णसंख्या
जळगाव शहर- २६९२, जळगाव ग्रामीण-४९२, भुसावळ-८७०, अमळनेर-६८९, चोपडा-७२५, पाचोरा-३७३, भडगाव-४१२, धरणगाव-४८१, यावल-४४९, एरंडोल-४९७, जामनेर-७१५, रावेर-६८३, पारोळा-४५५, चाळीसगाव-४४५, मुक्ताईनगर-३३३, बोदवड-२३९, इतर जिल्हे-४१ असे एकुण १० हजार ५९१ रूग्ण आढळले आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत ७ हजार १६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. बाधितांपैकी ३ हजार ८२ रूग्ण उपचार घेत असून आजपर्यंत ४९३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

Protected Content