दुसऱयांना नावे ठेवण्याची भाजपची जुनी परंपरा : जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे

जळगाव, प्रतिनिधी । देशात भारतीय जनता पार्टीच्या वतीने विरोधी पक्षातील नेत्यांना वेगवेगळी नावे ठेवून जनमानसामध्ये त्यांची प्रतिमा मलीन करण्याची परंपरा राहिलेली आहे. परंतु आता स्वतःवर आल्यामुळे इतकी पोटदुखी का ? असा प्रश्न एनएसआययु जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी उपस्थित केला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या व्हर्च्युअल सभेमध्ये बोलत असतांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना एक संदेश दिला की, “यापुढे आम्हाला चंपा, टरबूजा अशा प्रकारची नावे ठेवणाऱ्यांना तिथेच प्रत्येकाने चोख उत्तर द्यावे, भाजप पक्षाच्या या भूमिकेवरती आक्षेप घेतला व आपली भूमिका जिल्हाध्यक्ष मराठे यांनी स्पष्ट केली. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्याची परंपरा भाजपाची असल्याचा आरोप श्री. मराठे यांनी केला आहे. मग आता महाराष्ट्र राज्यमधील मागील काळातील भाजप पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची असक्षम कार्यपद्धती बघता, त्यांनासुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून “टरबुजाच्या व चंपा” अशी नावे देण्यात आली. मग आता जेव्हा स्वतः वरती आले तेव्हाच का पोटदुखी होते आहे..?असा सवाल जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी उपस्थित केला.

Protected Content