शरद पवारांच्या ईडी ऑफिस भेटीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील काही परिसरात जमावबंदी

4Sharad 20Pawar 201 3

मुंबई (वृत्तसंस्था) शरद पवारांच्या ईडी ऑफिस भेटीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील काही परिसरात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच ईडी कार्यालयाबाहेरही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील कार्यालयात शुक्रवारी स्वत:च उपस्थित राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले. त्यामुळे मुंबईतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. ईडी कार्यालयात जाण्याआधी शरद पवारांनी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले आहे. ईडी कार्यालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये, तसेच अनुचित प्रकार घडू नये आणि शांतता राखावी, असे पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे.

 

आज दुपारी दोनच्या सुमारास ते ईडीच्या कार्यालयात पोहोचतील. परंतु ‘ईडी’ त्यांना कार्यालयात प्रवेश नाकारण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. तसेच खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांनी कुलाबा, कफ परेड, मरीन ड्राइव्ह, आझाद मैदान, डोंगरी, जे. जे. मार्ग, एमआरए मार्ग या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जमावबंदीचे आदेश दिले आहेत.

Protected Content