ठाकरे आणि पटेल यांच्यात चर्चा

मुंबई प्रतिनिधी । शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्यात हॉटेल ट्रायडेंटमध्ये चर्चा झाली असून यात सत्ता स्थापनेवर मंथन करण्यात आले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी काल शरद पवार यांच्यासह आपल्या पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा केली. यानंतर रात्री या दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यानंतर हॉटेल ट्रायडंटमध्ये उध्दव ठाकरे आणि अहमद पटेल यांच्यात सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. यात किमान समान कार्यक्रमाबाबत चर्चा होऊन सत्ता स्थापनेवर मंथन झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Protected Content