कंगना आता डायरेक्ट कॅनडाच्या पंतप्रधानांवर खवळली!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने थेट फ्रान्समधील घटनेवरून कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनाही लक्ष्य करत जस्टिन ट्रूडो, उत्तर द्या, असे ट्वीट केले आहे.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या व्यंगचित्रावरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया दिली होती. यात त्यांनी ‘आपणा सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. पण ते अमर्याद नाहित. कोणालाही कुठेही आग लावण्याचा अधिकार नाही. आपल्याला दुसऱ्यांचा सन्मान करत काम करायला हवे. ज्यांच्यासोबत आपण या समाजात, या पृथ्वीवर राहतो, त्यांना इजा पोहोचवायला नको. प्रत्येक अधिकाराला मर्यादा असतात, असे म्हटले.

कंगनाने आपल्या ट्वीट करत प्रिय जस्टिन, आपण एका आदर्श जगात राहत नाही. लोकांनी असे वागायला नको. पण अनेकदा लोक आपल्या मर्यादा ओलांडतात, ते ड्रग्ज घेतात, दुसऱ्यांचे शोषण करतात, भावना दुखावतात. प्रत्येक छोट्या गुन्ह्याची शिक्षा शिरच्छेद असेल तर मग आपल्याला पंतप्रधान वा कोणत्याही कायद्याची काय गरज? असा सवाल कंगनाने जस्टिन ट्रूडो यांना केला आहे. तसेच तिने आपल्या ट्वीटमध्ये प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या व्यंगचित्रावरून कोणीही राम, कृष्ण, दुर्गा किंवा मग अल्लाह, ईसा मसीहाचे व्यंगचित्र बनवले तर प्रत्येकाला शिक्षा मिळायला हवी. वर्कप्लेस वा सोशल मीडियावर असे कृत्य करणाऱ्यांना आपण रोखले पाहिजे.असे म्हटले आहे .

Protected Content