स्वामी नारायण भक्तिमय पदयात्रा जल्लोषात

फैजपूर ता. यावल प्रतिनिधी । यावल तालुक्यातील स्वामी नारायण देवस्थान, न्हावी ते सुना सावखेडा (प्राचीन जागृत हनुमान देवस्थान) पदयात्रा स्वामी नारायण पंथ व हनुमान भक्तांनी खान्देशरत्न भक्ती किशोरदासजी महाराजांचे नेतृत्वाखाली आज काढण्यात आली.

गेल्या ७ – ८ महिन्यापासून कोरोना महामारीच्या लॉकडाऊनमुळे देशभरासह महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांची मोठी कोंडी झालेली होती मात्र कोरोनाची मंदावलेली स्थिती बघता महाराष्ट्र शासनाने नुकतीच मंदिरे व प्रार्थनास्थळ यावरील बंदी उठवली आहे याचा विनाविलंब न करता न्हावी येथील स्वामी नारायण समाज बांधवांनी शास्त्री भक्ती किशोरदासजी व अन्य संतांच्या सानिध्यात ही पदयात्रा घडवून आणली सदर पदयात्रा चे सुना सावखेडा प्राचीन जागृत हनुमान देवस्थान येथे समापन करण्यात आले.

याप्रसंगी येथे भक्ती किशोरदासजी यांनी विधिवत पूजा केली तद्नंतर कोरोना महामारी पासून समस्त व सर्व उपस्थित भाविक नागरिकांचे रक्षण होऊन कोरोना पासून भारतासह संपूर्ण विश्वाला मुक्ती मिळणेसाठी सामुहिक हनुमान चालिसा, व रामरक्षा चे पठण व महाआरती तसेच स्वामी नारायण संकीर्तन करण्यात आले ,संतांचे आशीर्वचन झालेत यामध्ये कोरोला महाभारी अजून संपलेली नसून या बाबी सर्वांनी अधिक सजग होऊन काळजी घेण्याचे आवाहन केले तद्नंतर उपस्थित भाविकांनी सामूहिक महाप्रसादचा आनंद घेतला.

 

याप्रसंगी शास्त्री भक्तीस्वरूपदासजी, शास्त्री धर्म प्रकाशदासजी, शास्त्री भक्तीप्रियदासजी, शास्त्री कृष्णप्रियदासजी ,शास्त्री लक्ष्मीनारायणदासजी, शास्त्री नित्यप्रकाशदासजी ,शास्त्रीसत्यप्रकाशदासजी, शास्त्री श्रीजीप्रियदासजी, पार्षद दीपक भगत, ज्ञानेश्वर भगत ,पुष्कर भगत ,हभप संजय महाराज, यासह स्वामीनारायण महिला नागरिकांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शास्त्री भक्ती किशोर दासजी यांनी केले

Protected Content