‘ताडोबा’त वाघिणीची शिकार झाल्याचा संशय

61666358

चंद्रपूर (वृत्तसंस्था) येथील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ताडोबा वनपरिक्षेत्रात एक वाघिण मृतावस्थेत आढळली. या वाघिणीचा नैसर्गिक मृत्यू झाला नसून तिची शिकार करण्यात आली आहे, अशी माहिती समोर आली आहे.

 

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कक्ष क्रमांक १२३ या ठिकाणी हरणे मारण्यासाठी जे फासे लावण्यात येते. ते फासे आढळून आले आहेत. या फाशात अडकून या वाघिणीचा मृत्यू झाला असून ही घटना दोन दिवसांपूर्वीची असल्याचे एका वन अधिकाऱ्याने म्हटले आहे. या वाघिणीचे वय अंदाजे दीड वर्षे आहे. क्षेत्रसंचालक प्रवीण एन.आर. यांच्यासह कोअर विभागाचे उपसंचालक ना.सि. लडकत यांनी घटनास्थळी भेट देऊन याची माहिती घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महेश खोरे अधिक तपास करीत आहेत.

Add Comment

Protected Content