जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील रिधूर गावातून दुचाकी चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीला अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आकाश विठ्ठल कोडी वय-२४, रा. रिधुर ता.जि. जळगाव असे अटक केलेल्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर पोलीस ठाण्यात तीन दुचाकीच्या चोरीच्या गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यातील आरोपी फरार होता. दरम्यान या पुण्यातील संशयीत आरोपी हा जळगाव तालुक्यातील रिधूर गावात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर, बबन पाटील, चालक भरत पाटील, प्रमोद ठाकूर यांनी कारवाई करत संशयित आरोपी आकाश विठ्ठल कोळी वय-२४, रा. रिधूर ता.जि. जळगाव याला शुक्रवारी १२ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत केली आहे. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीला अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.