दुचाकीच्या अपघातात प्रौढ गंभीर जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील जळके येथे अज्ञात दुचाकीस्वराने दिलेल्या धडकेत पायी जाणारे ५७ वर्षीय प्रौढ व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना ९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील जळकेरोड वरून उत्तम भगवान पाटील रा. जळके ता.जि.जळगाव हे मंगळवारी ९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी त्यांना समोरून येणाऱ्या अज्ञान दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात उत्तमराव भगवान पाटील हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जळगाव शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान अपघात घडल्यानंतर दुचाकीस्वार पसार झाला होता. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार गुरुवार ११ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल स्वप्निल पाटील हे करीत आहे.

Protected Content