हॉटेल मिनर्व्हा येथून तरूणाची दुचाकी लांबविली

 

जळगाव : प्रतिनिधी । शहरातील हॉटेल मिनर्व्हा येथून पेंटरचे काम करणाऱ्या तरूणाची दुचाकी लांबविल्याची घटना २९ नोव्हेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी आज दुचाकी चालकाच्या फिर्यादीवरू जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, किरण प्रकाश बिऱ्हाडे (वय-३७) रा. आसोदा ह.मु. पोलीस चौकी पिंप्राळा हे पेंटरचे काम करतात. त्यांच्याकडे कामासाठी (क्रमांक एमएच १९ बीएफ ९६६३) दुचाकी आहे. व्यवसाय आणि कामासाठी याचदुचाकीचा वापर करतात. २९ नाव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास शहरातील नवीन बसस्थानकाच्या बाजूला असलेल्या हॉटेल मिनर्व्हा येथे कामानिमित्त दुचाकीने आले. दुचाकी हॉटेलच्या पार्किंगमध्ये लावली होती. काम आटोपल्यानंतर त्यांना जागेवर दुचाकी आढळून आली नाही. दुचाकीचा इतरत्र शोधाशोध केली असता मिळून आली नाही. अखेर आज ११ डिसेंबर रोजी जिल्हा पेठ पोलीसात धाव घेवून दुचाकी चोरीची तक्रार दिली. किरण बिऱ्हाडे यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. प्रशांत पाठक करीत आहे.

Protected Content