श्रध्दा वालकरची हत्या करणाऱ्या नराधमाला फाशी द्या

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । श्रद्धा वालकर या तरुणीची अतिशय क्रुरपणे हत्या करणाऱ्या आफताबला अटक करून फाशी देण्यात यावी आणि अशा घटना रोखण्यासाठी ‘लव जिहाद विरोधी कायदा करावा’ या मागणीसाठी गुरुवार १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता हिंदू जनजागृती समिती आणि मातृशक्ती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येवून जिल्हाधिकारी अमान मित्तल यांना निवेदन देण्यात आले.

हिंदू जनजागृती समिती आणि मातृशक्ती संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पालघर येथील आफताब पुनावाला याने श्रद्धा वालकर या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यासोबत ‘लिव्ह इन’मध्ये राहत होता. श्रद्धाने लग्न करण्याविषयी त्याच्याकडे आग्रह धरल्यानंतर आफताबने तिची निर्घृण हत्या करून तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले. ही घटना अतिशय सुन्न करणारी असून देशभरातील तरुणींमध्ये दहशत निर्माण झाले आहे. तर देशात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. याच पद्धतीने देशात लव्ह जिहादच्या नावाखाली अनेक तरुणींना आपला जीव गमवावा लागत आहे. व दिवसेंदिवस ही समस्या गंभीर होत चालले आहे. त्यामुळे प्रशासनाने श्रद्धा वाडकर हिची हत्या करणाऱ्या नराधमाला तात्काळ अटक करून फाशी देण्यात यावी, असे प्रकार पुन्हा होणार नाही यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र पथक तयार करावे, लवकरात लवकर ‘लव जिहाद विरोधी कायदा आणि धर्मांतर बंदी कायदा’ लागू करण्यात यावा. उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर पोलिसांची विशेष शाखा स्थापन करण्यात यावी, यासह आदी मागण्यांसाठी गुरुवारी १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता हिंदू जनजागृती समिती व मातृशक्ती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी अमान मित्तल यांना निवेदन देण्यात आले.

Protected Content