पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारीपदी कविता सुर्वे यांची जिल्हा परिषद जळगावच्या वतीने नुकतीच निवड करण्यात आली. सुर्वे यांची निवड झाल्यामुळे छावा संघटनेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
तालुका छावा संघटनेचे पदाधिकारी तालुकाध्यक्ष विजय पाटील, प्रताप पाटील, विनोद पाटील, ईश्वर पाटील, अविनाश पाटील, सुनिल पाटील यांनी सुर्वे यांना शुभेच्छा देत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष पाटील म्हणाले की, कविता सुर्वे यांनी तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात गेल्या आठ वर्षापासून अतिशय छान व गुणवत्तापुर्ण शिक्षणासाठी कार्य करीत असून तामसवाडी बीटच्या शिक्षण विस्तार अधिकारी म्हणुन त्यांनी आपल्या उत्कृष्ट कार्याचा ठसा उमटविला आहे. तालुक्याभरातील सर्वच शिक्षक, शिक्षक संघटना व सामाजिक संघटना त्यांच्या कार्याने व कार्यतत्परतेने प्रभावित आहेत. म्हणुनच छावा संघटनेलाही त्यांच्या कार्याचे व व्यक्तीमत्वाचे कौतुक व अभिमान आहे. त्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी आज आम्ही कार्यालयात येवून त्यांचे अभिनंदन व सत्कार केला. त्यांच्या प्रत्येक चांगल्या कार्यात व उपक्रमात छावा संघटना त्यांच्या पाठीशी राहिल. सुर्वे यांनी फक्त तालुक्याच्या शैक्षणिक व गुणवत्ता विकास व शिक्षकांच्या समस्या अडी-अडचणी तात्काळ सोडविण्यास व सर्व घटकांमध्ये योग्य समन्वय साधुन शैक्षणिक लौकिक वाढविण्याचा व दाखलपात्र सर्वच विदयार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून सर्व शासकिय योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्याचा माझा अविरत प्रयत्न राहिल, असे प्रतिपादन पाटिल यांनी यावेळी केले.