संजय राऊत रुग्णालयातूनच लिहिताय अग्रलेख ; उद्या डिस्चार्ज मिळणार

sanjay ravut

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेचे ज्येष्ठे नेते संजय राऊत सध्या लिलावती रुग्णालयात दाखल आहेत. एन्जोप्लास्टी झाल्यामुळे त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला होता. परंतू राजकीय घडामोडी बघता ते उद्याच रुग्णालयातून डिस्चार्ज घेणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, रुग्णालयाच्या बेडवरवरून सामनासाठी अग्रलेख लिहित असल्याचा त्यांचा एक फोटो आज समोर आला आहे.

 

शिवसेनेचे ज्येष्ठे नेते संजय राऊत मागील १५ दिवसापासून दररोज सकाळी ते पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका मांडत होते. मात्र सोमवारी अचानक त्यांना छातीत दुखू लागल्याने ते लिलावती रुग्णालयात दाखल झाले. ट्विट मात्र त्यांनी नित्यनियमाने केले. आजही त्यांनी कामयाब अर्थात यशस्वी होण्यात शिवसेना मागे राहणार नसल्याचे सूचक ट्वीट केले आहे. इतकेच नव्हे तर, संजय राऊत रुग्णालयात बसून उद्यासाठी अग्रलेख लिहित असल्याचा त्यांचा एक फोटोही समोर आला आहे. या फोटोमध्ये संजय राऊत रुग्णालयाच्या बेडवर बसलेले दिसत आहेत. त्यांच्या हातात डॉक्टरांकडून लावण्यात आलेल्या सुया स्पष्टपणे दिसत आहेत. याही अवस्थेत संजय राऊत शिवसेनेला सत्तास्थापनेत सहभागी करण्यासाठी सक्रीय दिसत आहेत. राऊत यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला आहे. परंतू राजकीय घडामोडी बघता ते उद्याच रुग्णालयातून डिस्चार्ज घेणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.

Protected Content