मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सुप्रीम कोर्टाने आज राज्य निवडणूक आयोगाला तात्काळ निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यामुळे आता जि.प., पंचायत समित्या, नगरपालिका आणि महापालिका निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ॠसविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा
ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटला नसल्याने राज्य सरकारने या संदर्भात दोन विधेयके संमत करून निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. याला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. याबाबत दोनदा सुनावणी पुढे ढकलण्यात आली आज यावर सुनावणी झाली असून याबाबत सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला निर्देश देत दोन आठवड्याच्या आत निवडणुका घोषीत करण्याचे निर्देश दिलेत.
राज्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका आणि महापालिकांच्या निवडणुका प्रलंबीत असून सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे आता तात्काळ निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुप्रीम कोर्टाचा हा निकाल म्हणजे राज्य सरकारला बसलेला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. तर कोर्टाच्या निर्णयामुळे आता जून महिन्याच्या मध्यावर महापालिका व नगरपालिका तर यानंतर जूनच्या अखेरीस जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार असल्याची शक्यता आहे.