सुप्रिम कॉलनी दगडफेक प्रकरण : परस्परविरोधात गुन्हे दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरात धार्मीक स्थळाच्या बांधकामावरून दोन गटात तुफान दगडफेक केल्याची घटना रविवारी ९ जुलै रोजी दुपारी घडली होती. याप्रकरणी सोमवारी १० जुलै रोजी मध्यरात्री १ वाजता दोन्ही गटातील एकुण २६ जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरात बिसमिल्ला किरणा दुकानासमोर धार्मीकस्थळांचे बांधकामाचे काम ९ जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास सुरू होते. या बांधकामाच्या ठिकाणी काही तरूण उभे होते. त्यावेळी इतर एका विशिष्ट जातीचे तरूण त्याठिकाणी येवून हुज्जत घालण्याचा प्रयत्न करत वाद घातला. सुरूवातील वाद झाला त्यानंतर भांडण सुरू झाल्याने वाद विकोपाला गेला. त्यान दोन्ही गटातील तरूणांनी एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यास सुरूवात केली. या दगडफेकीत रविंद्र संतोष राठोड, फैसल शेख, सजन सुभाष राठोड, गोपी सुपडू राठोड, श्रीकांत माधवसिंग चौधरी, संतोष मोहन चव्हाण, आणि दिपक कृष्णा घुगे असे सहाजण जखमी झाले होते. त्यांना जिल्हाशासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. दरम्यान,घटनेची माहिती मिळताच चाळीसगावचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, स्थानिक गुन्ळे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह एमआयडीसी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. याप्रकरणी सोमवारी १० जुलै रोजी मध्यरात्री १ वाजता दोन्ही गटातील एकुण २५ जणांवर परस्परविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे हे करीत आहे.

Protected Content