Home क्राईम प्रेमनगरातून एकाची दुचाकी लांबविली

प्रेमनगरातून एकाची दुचाकी लांबविली

0
133


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील प्रेमनगरातील मधुबन अपार्टमेंट येथून एका तरूणाची दुचाकी चोरट्‌यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी १० जुलै रोजी सकाळी ११ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील प्रेम नगर परिसरातील मधुबन अपार्टमेंट येथे राहूल नरेंद्र काबरा (वय-३२) हा तरूण वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. शुक्रवार ७ जुलै रोजी रात्री ९ वाजता त्यांनी त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ जेबी ६२७३) ही पार्कींगला लावलेली होती. अज्ञात चेरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. त्यांनी परिसरात दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळाली नाही. अखेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी १० जुलै रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील पोलीस कर्मचारी करीत आहे.


Protected Content

Play sound