दुचाकी चोरीतील अट्टल गुन्हेगारास मध्यप्रदेशातून अटक; ७ दुचाकी हस्तगत

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यासह राज्यात जबरी चोरी प्रकरणातील एका संशयित आरोपीस मध्यप्रदेशातून अटक करण्यात आली असून त्याच्या ताब्यातील सात मोटारसायकली हस्तगत करण्यात आली आहे. याप्रकरणातील इतर साथीदार फरार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सात दुचाकी केल्या हस्तगत
मध्यप्रदेश राज्यातील एक तरूण जळगाव जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यातून मोटारसायकलांची चोरी करीत असल्याची माहिती जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाला मिळाली. त्यानुसार पोलीसांनी मध्यप्रदेशात जावून संशयित आरोपी किरण तुकाराम बारेला (वय-२५) रा. दुधखेडा ता. वरला जि. बडवाणी (मध्यप्रदेश) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याच्या ताब्यातील २ लाख ९० हजार रूपये किंमतीच्या सात मोटारसायकली पोलीसांनी हस्तगत केल्या.

गुन्ह्यातील सहभागी साथीदार फरार
वेगवेगळ्या परीसरातून मोटारसायकली चोरी करण्यासाठी संशयित आरोपी किरण बारेला सोबत नाना रायसिंग बासकले (वय-२२) रा. जामठी ता.वरला जि.बडवाणी , चोरीची दुचाकी विकणारे मनोज उर्फ मुन्ना कालम वंजारी (राठोड) रा. गंगानगर बलवाडी ता.वरला जि.बडवाणी, गुनीलाल भल्या पावरा (वय-३०) रा. मेलाने ता.चोपडा, सुभाष पावरा (वय-३०) रा. घेगाव ता.वरला जि. खरगोन यांची कसून शोध घेण्यात येत आहे.

यांनी केली कारवाई
पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके, अपर पोलीस अधिक्षक सचिन गोरे, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक बापु रोहोम यांनी पथक तयार करून स.फौ.अशोक महाजन, पोहेकॉ नारायण पाटील, रामचंद्र बोरसे, सुनिल दामोदरे, मनोज दुसाने, महेश महाजन, महेश पाटील, प्रविण हिवराळे, दिपक शिंदे, अरूण राजपूत, परेश महाजन यांना कारवाईसाठी रवाना केले.

Protected Content