जळगावात ट्रकच्या धडकेने मंदीराचे नुकसान; चालकावर गुन्हा

jalgaon truck news

जळगाव प्रतिनिधी । शहरातील दाणाबाजार परीसरात रात्री ट्रकने गोरक्षनाथ मंदीराला जोरदार धक्का दिल्याने मंदीराचे नुकसान झाले. याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील दाणाबाजार चौकात असलेल्या गोरखनाथ महाराज यांच्या मंदीर आहे. रात्री 10 वाजेच्या सुमारास ट्रक क्रमांक एमएच 18 बीजी 7986 रिव्हर्स येत असतांना अनावधनाने मंदीराला जोरदार धडक दिली. यात मंदीराचे 40 हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी मनपाचे आरोग्य निरीक्षक आंनद किशोर सोनार (वय-35) रा. गुरूनानक नगर यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीसात भाग 5 गुरनं 193/2019 भादवी 279, 427 प्रमाणे गुन्हा ट्रक चालक अरबाज खान तंटू खान (वय-21) रा. बलसाड ता. कसरावत जि. खरगौन (म.प्र.) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलीसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. पुढील तपास रविद्र सोनार करीत आहे.

Protected Content