शेतीमालाच्या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित नुकसानभरपाई द्या : अखिल भारतीय कोळी समाजाची मागणी (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात  अतिवृष्टीमुळे शेतीमालाचे नुकसान झाले असून या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून त्वरित नुकसानभरपाई देण्यात यावी  अशी मागणी  अखिल भारतीय कोळी समाजातार्फे जिल्हाधिकारी यांना जिल्हा युवा अध्यक्ष धनराज विठ्ठल साळुखे यांनी निवेदन देवून केली.

 

निवेदनाचा आशय असा की,  यावर्षी झालेल्या अवकाळी व अतिवृष्टीमुळे जळगाव, धुळे, नंदुरबारसह संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे शेतमालाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे.  उडीद, मुंग पिकांना अक्षरश: कोंब येवून खराब झालेले आहे. त्याचबरोबर कापूस, ज्वारी, सोयाबीन, मका या पिकांवर बुरशीजन्य रोग पसरल्याने शेती मालाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे.  आधीच बळीराजा विविध बँका, पतसंस्था, खाजगी सावकाराकडून तसेच नातेवाईकांकडून हात उसनवार करुन पैसे आणून शेतीच्या मशातगीसाठी खर्च केलेला आहे. शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला असून नापिकीमुळे शेतकऱ्यांना आत्महत्याशिवाय पर्याय नाही. शासनाने शेतकऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन संबंधित जिल्हा कृषीअधिक्षक, तसेच संबंधित तहसिलदार यांना नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन त्वरीत पंचनामे करुन हेक्टरी  पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी जळगाव जिल्हा युवा अध्यक्ष धनराज विठ्ठल साळुखे, गणेश हिरामण कोळी, अनिल देविदास नन्नवरे, कृष्णा सपकाळे, रमाकांत सोनवणे आदींच्या स्वाक्षरी आहे.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1521050831566246

 

Protected Content