अडावद, ता. चोपडा, प्रतिनिधी | येथील पोलीस स्टेशनला आज (दि.२८) आयोजित एका कार्यक्रमात श्रीकृष्ण धोटे यांनी नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन कायदा २०१३ व जादूटोणा विरोधी कायदा वैज्ञानिक दृष्टिकोन पोलीस आणि ग्रामस्थ यांना समजावा, तसेच अंधश्रद्धेमुळे नरबळीसारखे प्रकार थांबवले जावे, यासाठी चमत्कारामागचे रहस्य विविध प्रयोग करून उलगडून दाखवले.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक योगेश तांदळे, पोलीस उपनिरीक्षक यादव भदाणे, सरपंच भावना माळी, उपसरपंच उज्वला देशमुख, महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष साखरलाल महाजन, ग्रामपंचायत सदस्य हनुमान महाजन, जावेद खान, अल्ताफखा पठाण, अमिनरजा अब्दुल सत्तार, फकिरा तडवी, भारती महाजन, वडगाव पोलीस पाटील किरण पाटील, कृउबा संचालक दिनकर देशमुख, विकासो चेअरमन अनिल देशमुख, माजी उपसरपंच वजाहतअली काजी, शांताराम पवार, माजी सभापती ताहेर शेख, प्रभाकर महाजन, सचिन महाजन, रामकृष्ण महाजन, रंजना भोई, मिनाबाई कोळी, गुफ्तारबाई तडवी, सबनुर तडवी, नवाजुद्दीन नियाजोद्दीन, पोलीस नाईक योगेश गोसावी, जगदीश कोळंबे आदींसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.