यावलला आदीवासी कोळी समाजाची मंगळवारी बैठक

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील आदीवासी कोळी समाज बांधवाची  बैठक मंगळवार ३० जुलै रोजी येथील जिंनीग प्रेस खरेदी विक्री संघात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी यावल तालुक्यातील आदीवासी समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजनकांकडून करण्यात आले आहे.

 

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जि.प.गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे (वढोदा ) हे राहणार असून येत्या ९ ऑगस्ट ‘जागतिक आदीवासी दिन’ साजरा करण्याचे नियोजनासह विविध विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. तरी समाजातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे आजी माजी सदस्य‍, संरपच, ग्रामपंचायत सदस्यांसह विविध पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन यावल येथील प्रमोद कोळी, भरत कोळी, जांलधर कोळी, अमर कोळी, समाधान सोनवणे थोरगव्हाण, संदिप सोनवणे वढोदा, बबलु कोळी किनगाव, गंगाराम तायडे साकळी, गोकुळ तायडे मनवेल, गणेश कोळी मनवेल, गोकुळ कोळी मनवेल, किरण कोळी दहीगाव, नामदेव कोळी पाडळसा, जितेंद्र कोळी कासवा यांनी केले आहे.

Protected Content