थोरगव्हाण जि.प.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी झुरकाळे यांची निवड

yaval

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील थोरगव्हाण येथील जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी घनश्याम ज्ञानेश्वर झुरकाळे यांची तर उपाध्यक्षपदी निवृत्ती अरुण चौधरी यांची निवड करण्यात आली आहे.

 

शाळा व्यवस्थापन समितीच्या कार्यकरिणीची निवड करण्यासाठी दि.२० जुलै रोजी शाळेच्या कार्यालयात पालकसभा मुख्यध्यापक महेद्र देवरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षपदी निवड करण्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली असता तीन उमेदवारांचे नाव जाहीर झाल्यावर पेच निर्माण झाला. पालकांच्या आग्रहाने ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. त्यात घनश्याम झुरकाळे यांचे नाव निघाल्याने त्याची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी निवृत्ती अरुण चौधरी यांची एकमताने निवड करण्यात आली.

उर्वरीत कार्यकरिणीत सदस्यपदी विनोद पाटील, विनोद भालेराव, रेखाबाई सपकाळे, ज्योती सोनवणे, सुनील सुरवाडे, अश्विनी भोई, समाधान सोनवणे (शिक्षणप्रेमी), पदमाबाई पाटील(ग्रामपंचायत सदस्या), भावना पाटील, निलेश पाटील (शिक्षक प्रतिनिधी), महेद्र देवरे(सचिव) यांची निवड करण्यात आली. यावेळी सरपंच उमेश सोनवणे, उपसंरपच ज्योती पाटील, वासुदेव सपकाळे, संजय चौधरी, गणेश सोनवणे, सतीश गांवडे यांच्यासह अनेक पालक उपस्थित होते.

Protected Content