केर्‍हाळा येथील तरुणाची गुढी पाडव्याच्या दिवशी आत्महत्या

hatya

रावेर (प्रतिनीधी ) तालुक्यातील के-हाळा बु.येथील एका तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली.यासंदर्भात रावेर पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे.

रावेर  तालुक्यातील के-हाळा बुद्रुक येथील  इंदिरानगर भागातील  राहुल संजय सावळे ( वय २३ ) या तरुणांने  शेताच्या बांधावरील झाडाला ठिबक नळी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.  ही घटना आज सकाळी ९:३० वाजता उघड झाली. घटनास्थळी फौजदार नाजिम शेख यांनी भेट दिली.  याबाबत आकाश सुनील तायडे यांनी खबर दिल्याने रावेर पोलीस स्टेशनमध्ये सिआरपिसी १७४ प्रमाणे १३/१९ या क्रमांकाने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे.काँ. श्रीराम वानखेडे व सहकारी पुढील तपास करीत आहे.

Add Comment

Protected Content