Suicide : सुप्रिम कॉलनीतील एकाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सुप्रिम कॉलनी भागात राहणाऱ्या ४९ वर्षीय प्रौढ व्यक्तीने गळफास आत्महत्या केल्याची घटना सकाळी सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

सुदाम नानाजी पाटील (वय-४९) रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव असे गळफास घेतलेल्या प्रौढ व्यक्तीचे नाव आहे.

 

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगावातील सुप्रिम कॉलनीतील रहिवाशी सुदाम पाटील हे दोन वर्षांपुर्वी यवतमाळ येथे राहत होते. कापड विक्री करून आपला उदरनिर्वाह करत होते. कोरोनामुळे त्यांचा व्यवसायावर मोठा परिणाम झाला. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून जळगावात येवून नवीन उद्योग सुरू करण्याच्या तयारीत होते. त्यांनी घर देखील घेतलेले होते. सध्या सुदाम पाटील हे सुप्रिम कॉलनीत चुलतभाऊ संजय पाटील आणि देवीदास पाटील यांच्या घरी राहत होते. दरम्यान, बुधवार ३१ मे रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास सुदाम पाटील यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. हा प्रकार त्यांचे चुलत भावांच्या लक्षात आल्याने घटना उघडकीला आली. त्यांना खाली उतरवून जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी  यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात आई, पत्नी प्रतिभा, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!