चेन्नई वृत्तसंस्था । लोकप्रिय तामिळ अभिनेत्री चित्रा हिने आज पहाटे आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
ईव्हीपी फिल्म सिटीमध्ये शुटींग आटोपून चित्रा मध्यरात्री २.३० वाजता आपल्या हॉटेलमधील रुममध्ये आल्या होता. हॉटेलमध्ये भावी पती हेमंत यांच्यासमवेत त्या राहात होत्या. हेमंत यांच्यासोबत त्यांचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता. त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले की, शुटींगवरुन परतल्यानंतर चित्राने अंघोळीसाठी जात असल्याचं सांगितल. मात्र, खूप वेळानंतरही त्या बाथरुममधून बाहेर येत नसल्याचे लक्षात येताच हेमंत यांनी दरवाजा ठोठावला. तरीही, चित्राकडून काहीच प्रतिक्रिया न मिळाल्याने हेमंत यांनी हॉटेल स्टाफला यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर, डुप्लीकेट चावीने हॉटेल रुममधील तो दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी, सिलींगला चित्राचा मृतदेह लटकलेला आढळून आला.
अभिनेत्री चित्रा यांच्या आत्महत्येने खळबळ उडाली असून मनोरंजन विश्वातील तणावाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.