ड्रग तस्कर महाकाल अटकेत

मुंबई – ड्रग्ज तस्कर रिगल महाकाल याला एनसीबीकडून अटक करण्यात आली असून तो बॉलिवूडमधील अनेक सेलेब्रिटींना अंमली पदार्थांचा पुरवठा करत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात अंधेरी (पश्‍चिम ) परिसरातून मंगळवारी रात्री अंमलीपदार्थ नियंत्रण ब्युरोनं (एनसीबी) एक मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील एनसीबीनं मिलत नगर, लोखंडवाला भागात छापेमारी केली असून फरार ड्रग्ज पुरवणार्‍या रिगल महाकाल याला अटक केली आहे. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज आणि रोकडही जप्त करण्यात आली आहे. यात फरार आरोपी रिगल महाकाल नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. महाकाल हा ड्रग्ज पुरवठादार आहे. त्याला आज कोर्टात हजर केले जाणार आहे.

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत नैराश्यात असताना त्याला ड्रग्जही दिले जात होते, असा खुलासा तपासादरम्यान झाला होता. त्यामुळे या प्रकरणातील नव्या ड्रग्ज अँगलमुळे तपासाला नवी दिशा मिळाली होती. दरम्यान, सुशांतसिंहची प्रेयसी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांना या ड्रग्ज प्रकरणात एनसीबीनं अटक केली होती. तसेच बॉलिवूडच्या आघाडी अभिनेत्री दीपिका पदुकोन, सारा अली खान, रकुलप्रीत, श्रद्धा कपूर यांचीही चौकशी केली आहे.

Protected Content