किरकोळ विक्रेत्यांची होणार कोविड तपासणी

जळगाव प्रतिनिधी । दररोज लोकांच्या जास्त संपर्कात असणारे किरकोळ विक्रेते व हॉकर्सची आजपासून कोविड तपासणी सुरू करण्यात येणार आहे.

आगामी काळात पुन्हा संसर्ग वाढून दुसर्‍या लाटेचा शिरकाव होऊ नये यासाठी जिल्हाभरात अधिक व्यक्तींच्या संपर्कात येणारे विक्रेत्यांसह विविध घटकातील सुपर स्प्रेरडर्स यांच्या कोरोना तपासणीची विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा नोडल ऑफिसर्स तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात संसर्ग कमी झाल्याने नॉन कोविड सुविधा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यासह आगामी काळात येणार्‍या लसीच्या वाटपाबाबत नियोजनसाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार आजपासून ही विशेष तपासणी मोहिम सुरू होत आहे.

Protected Content