कोदगाव येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या

fb0cbae9 ac49 49c0 a091 9f00745d3a06

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील कोदगाव येथील एका 53 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आलीय. महादू विक्रम पाटील असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

आज दुपारी चार वाजेच्या सुमारास महादू पाटील हे गळफास घेतलेल्या अवस्थेत राहत्या घरात आढळून आले. त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. मयत महादू पाटील यांना दोन मुले असून यापैकी एक निलेश पाटील हे जळगाव येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असल्याचे समजते. तर दुसरा मुलगा नितीन पाटील हा भारतीय सैन्यदलात सेवा बजावत असल्याचे कळते. सदर घटनेबाबत कोदगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान, त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

Add Comment

Protected Content