केशकर्तनाच्या व्यवसायातील पैसे सैनिक निधीसाठी ! : चाळीसगावातील अनोखा उपक्रम

चाळीसगाव प्रतिनिधी । येथील विक्की जाधव यांनी आपल्या केश कर्तनाच्या व्यवसायातून तीन दिवसात येणारी सर्व रक्कम ही सैनिक निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा सर्वत्र तीव्र निषेध होत आहे. या पार्श्‍वभूमिवर, ह्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करत बसण्यापेक्षा आपण आपल्या दररोजच्या दैनंदिन गोष्टीतून आपल्या देशासाठी हौतात्म्य पत्कारलेल्या सैनिकांच्या कुटुबियांना कशा प्रकारे मदत करू शकतो हा विचार आपल्या चाळीसगाव शहरातील विक्की_ जाधव यांना स्वस्थ बसू देत नव्हता. म्हणून विक्की_ जाधव व त्यांच्या सहकार्‍यांनी एक अभिनव उपक्रम राबविला आहे. याच्या अंतर्गत ते आपल्या तीन दिवसाच्या दररोजच्या केशकर्तनाच्या व्यवसायातून मिळणार्‍या रकमेचा सदुपयोग करून ते पैसे सैनिकांसाठी पाठवणार आहेत. विक्की जाधव आणि त्यांचे सहकारी पवन महाजन, यज्ञेश बाविस्कर, जयेश वानखेडे आदींचे कौतुक केले जात आहे. तर त्यांच्या दुकानातील भूषण, पप्पू व रोहित यांचे त्यांना सहकार्य लाभत आहे.

Add Comment

Protected Content