यावल प्रतिनिधी | येथील देशमुख वाड्यातील रहिवासी वीस वर्षीय महाविद्यालयीन युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुदैवी घटना रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांने दिलेली माहितीनुसार, शहरातील देशमुख वाड्यातील लहान मारोती परिसरातील रहिवासी धनंजय किसन कोंडे (वय 20) हा भुसावळ येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. आज रविवार, दि.५ डिसेंबर रोजी घरात वरच्या मजल्यावर एकटा असतांना दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
वडील किसन कोंडे बाहेरून घरी आल्यावर त्यांना धनंजय हा घरातील वरच्या मजल्यावर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. नागरिकांच्या सहकार्याने त्यांनी धनंजय यास तातडीने उपचारासाठी भुसावळ येथे नेत असताना वाटेतच त्याचे निधन झाले आहे.
यावलच्या ग्रामीण रुग्णालयात डॉ. बी. बी. बारेला यांनी त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. मयत धनंजय याच्या पश्चात आई, वडील, तीन बहिणी असा परिवार असून धनंजय हा एकुलता मुलगा व तीन बहीणींचा एकटा भाऊ होता. त्याच्या अशा अकस्मात मृत्यूमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. राजेंद्र माधव कुंभारकर यांनी खबर दिल्यावरून येथील पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. धनंजय याच्या आत्महत्या करण्याचे कारण अस्पष्ट असून पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार बालक बा-हे पुढील तपास करीत आहेत.