ब्रेकींग : अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ईडीच्या ताब्यात

मुंबई प्रतिनिधी | सुकेश चंद्रशेखर आरोपी असणार्‍या मनी लॉंड्रींग प्रकरणात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसचा सहभाग आढळून आल्याने तिला आज मुंबई विमानतळावरून ईडीने ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे.

सुकेश चंद्रशेखर याच्यावर २०० कोटी रूपयांच्या मनी लॉंड्रींग प्रकरणात सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने गुन्हा दाखल केला आहे. यात सुकेश चंद्रशेखर याने एका उद्योगपतीच्या पत्नीकडून खंडणी उकळण्याचा आरोप असून यात इतरही अनेक आरोपी आहेत.

दरम्यान, ईडीने या प्रकरणी चौकशी केली असता प्रमुख सूत्रधार सुकेश चंद्रशेखर याच्या खात्यामधून अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस हिच्या खात्यात पैसे वळते करण्यात आल्याचे दिसून आले. ही रक्कम तब्बल दहा कोटींच्या आसपास असल्याची माहिती समोर आली. या पार्श्‍वभूमिवर, जॅकलीन ही आज सायंकाळी दुबई येथे एका शो निमित्त जाण्यासाठी मुंबई विमानतळावर आली असता तिला ईडीच्या पथकाने ताब्यात घेतले. तिला दिल्ली येथे नेऊन चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे.

Protected Content