जळगाव प्रतिनिधी । थर्टी फर्स्टनिमित्त केक घेण्यासाठी आई बाहेर गेली असता घरात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सायंकाळी घडली. याप्रकरणी शहर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राधिका भागवत भोसले (१५) असे मयत मुलीचे नाव आहे. सविस्तर माहिती अशी की, गेल्या तीन दिवसांपूर्वी राधिका ही आई व बहिणींसह जळगावातील इंद्रप्रस्थ नगरात भाड्याने घरात राहण्यासाठी आले होते. शुक्रवारी ३१ डिसेंबर रोजी दुपारी आई ही थर्टी फर्स्टनिमित्त केक घेण्यासाठी बाहेर गेली होती. आई बाहेर गेल्याचे पाहून राधिकाने राहत्या घरात साडीने गळफास घेवून आत्महत्या केली. थोड्याने वेळाने राधिकाची आई पंधरा ते वीस मिनिटांनी घरी आल्यावर मुलीने गळफास घेतल्याचे आढळून आले. मुलीचा मृतदेह पाहून आईने जागीच आक्रोश केला होता. आत्महत्या करण्याचे कारण कळू शकले नाही. शहर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.