दिवाळी कीट वाटपात मोठा घोटाळा ; राष्ट्रवादीचे निवेदन

 

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दिवाळीपुर्वी रेशनधारकांना दिवाळी कीट वाटपात मोठा घोटाळा झाला असून योजनेत झालेल्या घोटाळा झाला असून संबंधित ठेकेदाराची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस महानगरच्या वतीने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना शुक्रवारी २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिंदे व फडणवीस सरकारने दिवाळीपूर्वी प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी एक किलो रवा, डाळ, साखर व पामतेल अशा चार वस्तू १०० रुपयात देण्याची घोषणा केली होती. याचा लाभ राज्यातील १ कोटी ७० लाख शिधापत्रिकाधारकांना मिळणार होता. परंतु शासनाने केलेल्या तरतुदीनंतर ही योजना जाहीर झाल्यापासून वादात सापडली आहे. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेशन कंझूमर फेडरेशनने मालपुरवठाची निविदा मंजूर झाले असताना. मंत्रिमंडळातील एका वजनदार मंत्र्यांच्या सूचनेवरून नागपूरच्या उपठेकेदाराला काम देण्यात आले. ही योजना दिवाळीपूर्वीच पुरवठा करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. परंतू काही ठिकाणी साखर तर काही ठिकाणी काही वस्तू अपूर्ण ठेवत दिवाळी किट देण्यात आले. यामुळे रेशनधारकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शासनाच्या या योजनेत घोळ झाला असून याची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर उचित कारवाई करावी या मागणीसाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस महानगर च्या वतीने निदर्शने करण्यात आले.

या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस महानगरचे जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला जिल्हाध्यक्ष मंगला पाटील, रिंकू चौधरी, अरविंद मानकरी, इब्राहिम पटेल, अशोक सोनवणे, अमोल कोल्हे, दत्तात्रय सोनवणे, रहीम तडवी, मजहर पठाण, रमेश बऱ्हाटे, राजू बाविस्कर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content