जिल्हा परिषद समोर आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे धरणे आंदोलन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । वाढीव वेतन वेळेवर मिळावे, कोविड भत्ता वाढवून मिळावा, यासह विविध मागण्यांसाठी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने शुक्रवार ३१ डिसेंबर दुपारी १२ वाजता जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन करण्यात आले.

 

जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत.सदर मागण्यांबाबत जिल्हा परिषदकडे संघटनेने वेळोवेळी लेखी आणि तोंडी पाठपुरावा केला आहे. परंतु जिल्हा परिषदेने सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.

 

आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे आशा स्वयंसेविकांना कोव्हिड लसीकरणाचा मोबदला अदा करण्यात यावा, क्षयरोग आणि कुष्ठरोग सर्वेक्षणाच्या कामाचा थकीत मोबदला मिळावा,  ९ सप्टेंबर २१ च्या शासन आदेशानुसार आशा आणि गटप्रवर्तकांना जुलै २०२१ पासून केलेली मानधन वाढ आणि कोविड भत्ता थकबाकीसह लागू करण्यात यावा,सप्टेंबर २०२१ पासूनची आशा स्वयंसेविका २०००/-आणि गटप्रवर्तक ३०००/-  पासून थकीत मानधनाची रक्कम तातडीने अदा करावी,  आरोग्यवर्धिनी टिमबेस अंतर्गत काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना सन २०२० पासूनचे थकीत मानधन थकबाकीसह लागू करण्यात यावे यासह अन्य प्रलंबित मागण्यांकडे जिल्हा परिषदेचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले.

 

याप्रसंगी कल्पना भोई, भागिरथी पाटील, सुनंदा पाटील, सुनिता भोसले, भारती नेमाडे, रेखा सोनवणे, सुनंदा हाडपे, संगिता पाटील, भारती तायडे, उषा पाटील, अनिता कोल्हे, सुनिता विनंते, माया खैरनार, योगिता बारी, रेखा तायडे, आशा पोहेकर, भारती चौधरी, करूणा कुमावत, भारती पाटील आदी उपस्थित होते.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!