शेतात अचानक आग ; २ लाखांचे नुकसान (व्हिडीओ)

y

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील चोपडा मार्गावरील शरद वासुदेव यावलकर यांच्या शेतात अचानक आग लागल्याने कापूस व शेती साहित्य-अवजारे जळुन खाक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत सुमारे दोन लाखांचे नुकसान झाल्याची माहिती असून यावल पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शरद वासुदेव यावलकर (रा.यावल) यांचे चोपडा मार्गावरील शेतात (दि.२७) रोजी सांयकाळी सुमारे ७ ते ७.३० वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने शेतातील गोठ्यात ठेवलेली ६ ते ७ क्विंटल कापुस, चाळीस ताडपत्र्या आणि काही पाईप असे एकुण जवळपास दिड ते दोन लाखांचे नुकसान झाले आहे. अचानक लागलेल्या या आगीची माहीती शरद यावलकर यांना त्यांच्या शेजारील शेतकरी बांधवांकडुन मिळाली. माहिती मिळताच यावलकर हे तात्काळ आपल्या शेतात पोहोचल्यावर त्यांनी व शेतकरी बांधवांनी मिळुन आग विझवण्याचा प्रयत्न केल्या. नंतर यावल नगर परिषदच्या अग्निशमनच्या बंबाद्वारे आग विझवण्यात आली. शेतातही आग कशामुळे लागली की लावण्यात आली हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

Protected Content