एकच निर्धार, रक्षाताई तिसर्‍यांदा खासदार : यावल तालुक्यात प्रचार फेर्‍यांना प्रतिसाद !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खासदार रक्षाताई खडसे यांनी यावल तालुक्यात काढलेल्या प्रचार फेर्‍यांना अतिशय उत्स्फुर्त असा प्रतिसाद लाभला असून यातून रक्षाताईंना तिसर्‍यांदा संधी मिळण्यासाठी मतदारांना साद घालण्यात आली.

आरावेर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार खासदार रक्षाताई खडसे या तिसर्‍यांदा जनतेचा कौल मागत आहेत. त्यांनी प्रचार फेर्‍यांच्या माध्यमातून मतदारसंघ पिंजून काढला असून त्यांना लोकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. रक्षाताईंनी शनिवारी यावल तालुक्यातील विविध गावांमध्ये झंझावाती प्रचार केला.

याच्या अंतर्गत यावल तालुक्यातील फैजपूर, किनगाव, यावल शहर आणि न्हावी आदी गावांमधून प्रचार फेर्‍या काढण्यात आल्या. यात रक्षाताईंचे ठिकठिकाणी अतिशय उत्स्फुर्त असे स्वागत करण्यात आले. त्यांचे अनेक ठिकाणी पुष्पवर्षावात स्वागत झाले. तर, बर्‍याच ठिकाणी महिलांनी त्यांचे औक्षण करून निवडणुकीतील विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

या प्रचार फेर्‍यांमध्ये रक्षाताई खडसे यांच्यासह रावेर लोकसभा निरिक्षक तथा माजी मंत्री आमदार संजय कुटे व भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे तसेच यावल शहर व यावल तालुक्यातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी_ कॉंग्रेस, आरपीआय, रासप, मनसे आदी मित्र पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Protected Content