श्रीपाराच्या गणपती मंदिरात नारळ फोडून रावेरात श्रीराम पाटील यांच्या प्रचाराला झाली सुरूवात

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचाराचा नारळ आज ५ मे रोजी ग्रामदैवत श्री पाराच्या गणपती मंदिरात वाढविण्यात आला.

रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या उपस्थितीत जिल्हा शिवसेना उपप्रमुख प्रल्हाद महाजन, माजी नगराध्यक्ष हरीश गनवाणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, माजी नगराध्यक्ष शितल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री गणपतीची पूजा करून आरती करण्यात आली. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद जफर मोहम्मद, डॉ राजेंद्र पाटील, योगीराज पाटील, विनायक महाजन, एस आर चौधरी, अशोक शिंदे, सुरेश चिंधू पाटील, अब्दुल मुतालिब, संजय वाणी, सोपान बाबुराव पाटील, सादिक मेंबर, आयुब मेंबर, यशवंत धनके, एडवोकेट टी डी पाटील, एडवोकेट आर आर पाटील, योगेश बारी, ज्ञानेश्वर महाजन, प्रा डी एस चौधरी, प्रमोद पाटील, प्रशांत पाटील, सउद शेख यांच्यासह महाविकास आघाडीचे शेकडो स्त्री पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यकर्त्यांनी रावेर शहरातील सर्वच प्रमुख मार्गावरून मतदारांच्या गाठीभेटी घेत श्रीराम पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले. मतदारांनी ही यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Protected Content