पहूर येथे संतोषी माता नगरात चोरी; 25 हजाराचा ऐवज लंपास

0

pahur chori

पहूर, जामनेर (वार्ताहर) । येथील संतोषी माता नगरातील रहिवासी रवींद्र पाटील यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी कडी कोयंडा तोडून 25 हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना आज मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

याबाबत माहिती अशी की, पहूर येथील शुभम मेडीकलचे संचालक रवींद्र सुपडू पाटील यांचे भाऊ जळगांवला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे श्री. पाटील कुटूंबासह जळगांवला गेल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी डाव साधत घराचा कडी-कोयंडा तोडून घरातील सामान अस्थाव्यस्त करून सुमारे 25 हजार रूपयांचा ऐवज लंपास करून पोबारा केला. सदर घटना रात्री बारा ते पहाटे तीनच्या दरम्यान घडली. या प्रकरणी पोलीसात तक्रार दिली असल्याचे समजते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!