जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्याच्या नावाने इन्स्टाग्रामवर अकाऊंट तयार करून त्यावरून बदनामीकारक पोस्ट शेअर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सोमवारी ३० सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भडगाव तालुक्याच्या नावाने एका अनोळखी व्यक्तीने इन्स्टाग्रामवर अकाऊंट तयार केले आहे. या अकाऊंटवरून २७ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर दरम्यान अनोळखी व्यक्तीने या अकाऊंटवरून बदनामीकारक मॅसेज व पोस्ट शेअर केले. दरम्यान या पोस्टच्या माध्यमातून बदनामी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर जाकीर खान यासीन खान कुरेशी वय ४८ रा. भडगाव यांनी सोमवारी ३० सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड हे करीत आहे.