रावेर, प्रतिनिधी | काल भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष निवडीच्या सभेत जो प्रकार घडला त्यातून बेशिस्त दिसून आली. त्यामुळे जनतेचा नेत्यांवरील विश्वास कमी होतो, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्रभैय्या पाटील यांनी आज (दि११) येथील कृषी उपन्न बाजार समितीत आयोजित एका रक्तदान शिबिरास भेट देण्यासाठी आले असताना ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलताना व्यक्त केले.
ते म्हणाले की, कुठल्याही पक्षात असल्या प्रवृत्ती नको, त्यात भाजपा तर मोठा शिस्तीचा पक्ष समजला जातो. त्यातले नेते आणि कार्यकर्ते शिस्तीचे भोक्ते म्हटले जातात. त्यामुळे हे प्रकार घडायला नकोत. असेही ते म्हणाले.